आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flight Turns Back To Los Angeles After Leak \'Floods Aisles\'

विमानातही लीकेज : अमेरिकेहून ऑस्ट्रेलियाला जाणारी फ्लाईट अर्ध्यातून परतली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजल्सहून मेलबर्नकडे निघालेल्या Qantas एअरवेजच्या A380 या विमानामध्ये अचानक पाणी गळती सुरू झाल्याने विमान तासाभराच्या प्रवासानंतर पुन्हा अमेरिकेला परतले. या प्रकारामुळे प्रवासाला कोणताही धोका नसला, तरी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागू नये म्हणून कॅप्टनने विमान परत फिरवण्याचा निर्णय घेतला.
विमानाने उड्डाण घेतल्यानंतर सुमारे तासभर सर्व प्रवास सुरळीत झाला. नेहमीप्रमाणे प्रवास सुरू असतानाच अचानक मध्या रांगेतील भागामध्ये पाणी गळायला सुरुवात झाली. विमानातील कर्मचा-यांनी प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून मदत केली. त्यांना दुस-या जागांवर बसण्याची व्यवस्था करून देण्यात आल्याचे, क्वांटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मात्र हा प्रकार कशामुळे घडला याचा शोध घेत असून अद्याप कारण समजले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर प्रवाशांची एका रात्रीसाठी एका हॉ़टेलमध्ये व्यवस्था करण्यात आल्याचे एअरलाईनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच इंजिनिअर्स दुरुस्तीच्या कामात व्यस्त असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकारानंतर सुरुवातीला विमानात एकच गोंधळ सुरू झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले.
या विमानामध्ये हॉलीवूड अभिनेत्री निकोल ब्राऊन हीदेखिल प्रवास करत होती. हा संपूर्ण प्रकार सुरुवातीला अत्यंत भयावह जाणवल्याची प्रतिक्रिया तिने माध्यमांबरोबर बोलताना दिली.
फोटो - विमानाच्या छतातून होणारी पाणी गळती