आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Floating Solar Engergy Project Supply Electricity To House In Japan

जपानमध्ये तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पातून घरांना मिळेल ऊर्जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात ऊर्जानिर्मितीचे नवनवे प्रयोग सुरू असताना याच दिशेने जपानच्या चिबा प्रांतातील यामाकुरा धरणावरील पाण्यावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आकाराला आला आहे. यामुळे ५ हजार घरांना ऊर्जा मिळणार आहे. या सौरउर्जा प्रकल्प योजनेतून वर्षाला वातावरणातील वा इतर ऊर्जेतून वीज मिळवताना निर्माण होणारा वा पूर्वी निर्माण होणा-या ८ हजार टन कार्बन डायऑक्साइडमध्ये (म्हणजे प्रदूषणात)आता घट होणार आहे. या योजनेचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. त्यांच्या तांत्रिक चाचणीचे काम फक्त बाकी आहे. एक लाख १८ हजार चौरस मीटर क्षेत्र या तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाने आपल्या कवेत घेतले आहे. यामध्ये ५० हजार फोटोवॉल्टिक सोलार पॅनल लावण्यात आले आहेत. यामाकुरा धरणावरील या प्रकल्प क्योसेरा इलेक्ट्रॉनिक्स समवेत तीन कंपन्यांच्या सहकार्यातून तयार झाला आहे. अनेक देशात सौरऊर्जा प्रकल्प आहेत, मात्र ते सर्व जमिनीवर. जपानमध्ये पाण्यावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प बांधण्याचे कारण हेच की इथे जमिनीची अगदी कृषी क्षेत्रालासुद्धा सहजासहजी उपलब्धी होत नाही. हेच कारण आहे की, आता येथे तलाव, सरोवरे, बांध, धरणे आणि नद्यांवर असे तरंगते सौरऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रा. यांग यांग म्हणतात की, ही खूपच उत्सुकतापूर्ण कल्पना आहे. आणि आम्ही त्यात यशस्वी झालो तर हे फार मोठे यश असेल.
global.kyocera.com
पुढे पाहा कॅमे-यात कैद केलेली तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाची छायाचित्रे...