आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक अधिकृत काश्मीरमध्ये पूराचा कहर; पाहा, हृदय हेलावून टाकणारे PHOTO

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूरात अडकलेल्या कुटुंबाचे सदस्य मदतीसाठी आवाज देताना

अमृतसर - उत्तर भारतात पावसामुळे आलेल्या पूरात केवळ काश्मीरच नाही तर सीमा भागात असलेल्या पाकअधिकृत काश्मीरलाही जोरदार फटका बसला आहे. पाकिस्तानमधील पंजाब राज्यातील अनेक गावे पूराच्या पाण्यात डुबली आहेत. पीओके आणि पंजाब प्रांतातील जवळपास 450 जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानमध्ये असलेल्या साहिब गुरूद्वारामध्येही पाणी शिरले
रावी दरियाचे पाणी करतारपुर येथील साहिब गुरूद्वार्‍याच्या परिसरात पोहोचले. परिसरातील जवळपास 300 नागरीकांनी पूरापासून वाचण्यासाठी गुरूद्वार्‍यात शरण घेतले होते. येथील लंगरमध्ये या लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने या लोकांना बचावात्मक सामग्री पाठवली आहे. याच गुरूद्वार्‍यामध्ये गुरू नानक देव हे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात राहिले होते आणि येथेच ज्योती ज्योतमध्ये समावाले होते. हा गुरूद्वारा डेरा बाबा नानकपासून जवळपास अडीच किलोमिटर दूर पाकिस्तानातील रावी दरिया येथील किनार्‍यावर आहे.
पीडित जास्त, सामग्री कमी
पाकिस्तान सरकारला या पीडितांसाठी मदत पाठवणे कठीण जात असल्याचे दिसत आहे. पूरामध्ये जे लोक बचावले आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणे अवघड जात आहे. तर स्वयंसेवक गावोगाव जाऊन मदत सामग्री वितरीत करत आहेत. मदतीची जशी कोणती गाडी या ठिकाणी पोहोचते, लोक त्या गाडीवर तुटून पडतात. अनेक ठिकाणी तर मारामारी ही होते.
पुढील स्लाईडवर पाहा, पीओकेमध्ये पूरामुळे बिघडलेल्या परिस्थितीचे फोटो