(पूरानंतर फ्रांसच्या मॉन्टपेलिअर शहराचे चित्र)
पॅरिस – फ्रांसच्या मॉन्टपेलिअर शहरामध्ये असलेल्या लेज नदीला आलेल्या अचानक पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हाणी झाली आहे. पूरामुळे तटवर्ती भागाचे नुकसान झाले आहे. कित्येक गाड्या पूरात वाहून गेल्या आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर गाड्या झाडावर लटकलेल्या दिसल्या. तर काही गाड्या एकमेकांवर चढलेल्या दिसल्या.
या घटनेमुळे जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार हजारो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. तर मोठ्या प्रमाणावर लोक रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर अडकलेले आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, फ्रांसमधील पुरामुळे उडालेल्या दाणादाणीचे छायाचित्रे..