आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Florence Tomb Opened In Search For Identity Of Mona Lisa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोनालिसाच्या कुळाचे रहस्य उलगडण्यासाठी डीएनए टेस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - लिओ नार्दो दा विंचीच्या जगप्रसिद्ध छायाचित्रातील मोनालिसाच्या वास्तविक जीवनाचा वेध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी फ्लोरेन्स येथील कबर खोदली असून डीएनए नमुन्याद्वारे मोनालिसाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

इटलीतील रेशीम व्यापारी फ्रान्सिस्को डेल गिओकोंडो यांच्या कुटुंबीयांची ही कबर असून त्यांची पत्नी लिसा गेरार्डीनी यांनी 16 व्या शतकात लिओ नार्दो दा विंचीच्या चित्रासाठी पोझ दिल्याचे सांगण्यात येते. इटलीतील सॅन्टीस्सिमी अन्नूझिंयाटा बासिलिकाच्या स्मशानभूमीत ही कबर आहे. शास्त्रज्ञांनी या कबरीच्या दगडाला गोल छिद्र पाडले. त्यातून हाडांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. त्या नमुन्यांची गेल्या वर्षी एका चर्चजवळ सापडलेल्या तीन महिलांच्या अवशेषांशी तुलना केली जाणार आहे. कबरीमधील हाडे लिसाच्या रक्ताच्या नात्यातील म्हणजेच मुलाचे असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते. आई आणि मुलाच्या डीएनएमध्ये साधर्म्य आढळले तर आम्हाला मोनालिसा सापडलीच समजा, असे सिल्व्हानो व्हिन्सेटी या शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

अशी होणार पडताळणी
कबरीमधून हाडांचे घेतलेले डीएनए नमुने चर्चजवळ सापडलेल्या अवशेषांच्या डीएनएशी जुळल्यानंतर अवशेषांच्या आधारे लिसा गेरार्डीनीच्या चेहर्‍याची प्रतिमा तयार केली जाणार असून मोनालिसाच्या छायाचित्रातील चेहर्‍याशी तिची तुलना करून पाहिली जाणार आहे.

ऐतिहासिक उत्सुकता
पॅरिसमधील लुव्र संग्रहालयात लावण्यात आलेल्या मोनालिसाच्या गूढ हास्याच्या चित्राने शतकानुशतके इतिहासतज्ज्ञांना चकित करून टाकले आहे. मोनालिसाचे गूढ उकलण्याचा तेव्हापासूनच इतिहासतज्ज्ञांचा प्रयत्न आहे. लिओ नार्दोच्या प्रतिभेतूनच हे चित्र साकारले आहे, असा एक सिद्धांत मांडण्यात आला. मात्र, मोनालिसाचा शोध काही थांबला नाही.

कोण होती लिसा? : रेशीम व्यापारी पतीच्या निधनानंतर लिसा गेरार्डीनी नन बनली. वयाच्या 63 व्या वर्षी 15 जुलै 1542 मध्ये सेंट उर्शुला चर्चमध्ये तिचे निधन झाले.