आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FM Redio Give Information Related Laws In Pakistan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानात एफएम रेडिओ देतोय लोकांना कायद्याची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर - पाकिस्तान म्हटले की दहशतवादी कारवाया आणि हिंसाचार अशाच घटनांची जंत्री डोळ्यांसमोर येते. मात्र, खैबर पख्तुनख्वाह प्रांतातील न्यायिक अकादमीने एक खास एफएम रेडिओ सुरू केला आहे. ‘रेडिओ मिजान 96.6’ असे नाव असलेल्या या रेडिओ केंद्रावरून लोकांना कायद्याची माहिती देण्यात येत आहे.


सध्या या एफएम केंद्रावरून इंग्रजी, उर्दू आणि पश्तून भाषेमध्ये दररोज तीन तास कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात येत आहे.लोकांना कायदेशीर सल्ला देणे हा या रेडिओचा मुख्य उद्देश असून सध्या तो फक्त पेशावरमध्ये ऐकता येतो. रेडिओ पाकिस्तानचे अनेक सेवानिवृत्त अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, सेवानिवृत्त न्यायाधीश, वकील आणि सर्वसामान्य जनता मिळून हे केंद्र चालवत आहेत.


वेगळा मिजाज
इतर एफएमच्या तुलनेत रेडिओ मिजानच्या कार्यक्रम प्रसारणाची शैलीच वेगळी आहे. या केंद्राचे निवेदक मोठ्या आवाजात घाईघाईने निवेदन करण्याऐवजी लोकांशी ते थेट बोलत आहेत, अशा शैलीत निवेदन करतात.