आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Folt In Japan Fukushima Nuclear Project Cooling System For Mouse

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उंदरांनी बंद पाडली फुकुशिमा अणुप्रकल्पाची कूलिंग सिस्टीम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- भूकंप, त्सुनामी आणि त्यानंतर फुकुशिमा येथील अणुऊर्जा प्रकल्पातून होणारा किरणोत्सर्गाच्या मोठ्या संकटांतून सावरलेल्या जपानसमोर आणखी एक समस्या उद्‍भवली आहे. ती म्हणजे फुकुशिमा येथील अणुऊर्जा प्रकल्पातील कूलिंग सिस्टीम नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे वीजनिर्मितीला मोठा फटका बसला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उंदरांमुळे अणुऊर्जा प्रकल्पाची कूलिंग सिस्टीम खराब झाल्याचा दावा येथील अभियंत्यांनी केला आहे.

फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात आता उंदरांनी हैदोस घातला आहे. अणुऊर्जानिर्मितीसाठी लागणार्‍या अणुइंधनही सोमवारी उंदरांनी डल्ला मारला होता. त्यामुळे तब्बल 40 तास तेथील ऊर्जानिर्मिती ठप्प झाली होती. उंदरांचा त्रास असाच कायम राहिल्यास त्याचा भविष्‍यात गंभीर परिणाम होऊ शकतो, असे प्रकल्पाची देखरेख करणार्‍या 'टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी'ने म्हटले आहे.

सन 2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या प्रलयकारी त्सुनामीमुळे या प्रकल्पाच्या तीन रिअ‍ॅक्टर्सला धोका पोहोचला होता. त्यामुळे किरणोत्सर्गाचा फटका जमीन आणि समुद्रानजीक राहणार्‍या सुमारे दहा हजार घरांना बसला होता.
'प्रकल्पातील स्विचबोर्डांतील वायर्सही यापूर्वी उंदरांनी कुरतडल्याचे स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे प्रकल्पाच्या परिसरात मेलेले उंदरही आढळून आल्याचे येथील अधिकार्‍यांनी सांगितले आहे.