आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका चाकाच्या सायकलवर बसून फुटबॉलचे वेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमेरिकेतील टेक्सासमधील नागरिकांमध्ये हल्ली युनिसायकल फुटबॉलचे वेड वाढत आहे. या खेळात एका चाकाच्या सायकलवर बसून फुटबॉल खेळला जातो. या खेळाचे बदललेले हे नववे रूप असले तरी तेथील लोकांमध्ये खूप पसंत केले जात आहे. 1998 मध्ये टेक्सासमधील युनिसायकल फुटबॉल लीग (यूएफएल) च्या स्वरूपात या खेळाची सुरुवात झाली. खेळाचे सर्व नियम नेहमीच्या फुटबॉलसारखेच आहेत. फक्त यातील खेळाडूंना एका चाकाच्या सायकलवर बसून खेळावे लागते. यूएफएलमध्ये बर्जेकर्स, गनार्वेल्स, हॉट डॉग्स, युनिसायकोज, इल ईगल्स आणि हेल ऑन व्हिल्स या सहा टीमचा समावेश आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक स्थानिकांतर्फे आर्थिक मदत केली जाते. यू ट्यूबवर टाकलेल्या या खेळाचे व्हिडिओ 1 लाख 17 हजार 887 पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहेत.
latinospost.com