आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 फूट बोगदा खोदून बँकेवर डल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बर्लिन - जर्मनीच्या बर्लिन शहरातील एक बँक लुटण्यासाठी चोरट्यांनी सेफ डिपॉझिट रूमपर्यंत शंभर फूट लांबीचा बोगदा खोदला आणि काम फत्ते करून बोगद्यात आग लावून चोरटे पसार झाल्याचे जर्मन पोलिसांनी म्हटले आहे. एका भूमिगत गॅरेजपासून बँकेच्या सेफ डिपॉझिट रूमपर्यंत अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हा बोगदा खोदण्यात आला आहे. तो खोदण्यासाठी कित्येक महिने लागले असण्याची शक्यता आहे. नियोजनबद्ध पद्धतीने या बोगद्याचे बांधकाम करण्यात आले असून सिलिंगला आधार देणारे खांबही बांधण्यात आले आहेत, असे जर्मन पोलिसांचे प्रवक्ते नेयूनडॉर्फ यांनी सांगितले. सेफ डिपॉझिट रूममधून धूर येत असल्याचे बँकेच्या सुरक्षारक्षकाने सोमवारी भल्या पहाटेच पोलिसांना कळवले. चोरट्यांनी डिपॉझिट रूममधून किती ऐवज पळवला याचा पोलिस अंदाज घेत आहेत.