आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक स्वच्छतेसाठी वापरा ‘फेसवॉश’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - फेसबुक प्रोफाइलवरील बीभत्स, अश्लील पोस्ट्स डिलीट करण्यासाठी ‘फेसवॉश’ नावाचे नवे अ‍ॅप विकसित केले आहे. केंट विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केलेले हे अ‍ॅप फेसबुक वापरकर्त्याच्या अ‍ॅक्टिव्हिटी आणि कंटेंट सर्च करून नको असलेल्या पोस्ट्स आणि कंटेंट्स डिलीट करते किंवा लपवून टाकते. फेसबुक वॉलवर नको असलेला बराचसा कंटेंट पोस्ट झालेला असतो, तो काढून टाकणेही कंटाळवाणे असते. ही गरज लक्षात घेऊन आम्ही फेसवॉश हे अ‍ॅप विकसित केल्याचे डॅनियल गुर यांनी म्हटले आहे. गुर आणि त्यांच्या दोन मित्रांनी केवळ दोनच दिवसांत फेसवॉश हे अ‍ॅप तयार केले.

कुठे मिळेल : हे अ‍ॅप वापरण्यासाठी kwww.Facewa.shl या वेबसाइटवर जाऊन गेट सार्टेडवर जाऊन फेसबुकवर लॉग इन करावे लागते. त्यानंतर वापरकर्त्याला ‘गो टू अ‍ॅप’वर जाण्यास सांगितले जाते. नंतर वापरकर्त्याच्या प्रोफाइलचा कंटेंट अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागते. सध्या हे अ‍ॅप बेटा टप्प्यात असल्यामुळे वापरकर्त्यांना काही वेळा थोड्या गिल्चेसना सामोरे जावे लागते.