आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Surving In The Fashion South African Use Teeth Removing

फॅशनच्या युगात टिकण्‍यासाठी दक्षिण अफ्रिकेत दात पाडो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दक्षिण अफ्रिकेतील तरुणांमध्ये एक फॅशन ट्रेंड कधीच आऊट ऑ फ फॅशन झाला नाही. केपटाऊन आणि परिसरातील तरुण डेंटल मॉडिफिकेशन करून घेत आहेत. ऐकून विचित्र वाटेल, पण तेथील तरुण ट्रेंडमध्ये राहण्यासाठी समोरील दात पाडून घेत आहेत. यातील बहुतांश तरुणांमध्ये बॅगी स्वेटर घालणे आणि शायनी सनग्लासेस घातलेल्या चेह-यावर ‘टूथलेस’ स्माइल हे युनिक मानले जाते. एखादा फॅशन ट्रेंड सलग 60 वर्षे टिकून राहणे, ही आश्चर्यकारक बाब आहे. 21 वर्षांचा याजीड अ‍ॅडम्स सांगतो की, हा फॅशन ट्रेंड कुणालाही आवडतो. आम्ही त्याला ‘केप फ्लेट्स’ स्माइल असे म्हणतो. येथे हजारो तरुण आहेत, जे अशा प्रकारे मॉडिफिकेशन करून घेत आहेत. जॅक्वी फ्रेडलिंग सांगतो की, फॅशनमध्ये टिकून राहण्यासाठी मी माझे दात पाडून घेतले आहेत. माझे आई-वडील तरुण होते, त्या काळापासून हा फॅशन ट्रेंड आहे.

काही जण म्हणतात की, या ट्रेंडची सुरुवात मच्छिमारांनी केली होती. समुद्रातील मोठ्या लाटांच्या आवाजामुळे या लोकांना एकमेकांचे बोलणे ऐकू येत नसायचे. त्यामुळे त्यांनी आपला एक दात पाडून घेतला. जेणेकरून ते समुद्रात असताना शिटी वाजवून एकमेकांशी बोलू शकतील.

odditycentral.com