आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताण घालवण्यासाठी मद्याचा आधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ताण घालवण्यासाठी तुम्ही काय उपाय करता ? विश्वास बसणार नाही. परंतु ब्रिटनमध्ये दिवसभराचा तणाव घालवण्यासाठी मद्याचा आधार घेतला जातो. कामाचा ताण जावा म्हणून देशातील दोन तृतीयांश नागरिक मद्याच्या चषकात बुडतात, असे एका पाहणीतून दिसून आले आहे.
ब्रिटनमधील 35 ते 45 वयाच्या नागरिकांची पाहणी करण्यात आली. त्यात दोन हजार नागरिक सहभागी झाले होते. पाचपैकी एक पुरुष तर सहापैकी प्रत्येकी एक महिलेने रोज मद्यपान करत असल्याचे कबूल केले आहे. दिवसभराचा ताण घालवण्यासाठी आपण हे कृत्य करतो, असे त्यांनी सांगितले.
दहा महिलांपैकी चार महिला व तीन पुरुषांनी नियम तोडून मद्य प्राशन करत असल्याचे सांगितले. सरकारने मद्य प्राशन करण्याविषयीची काही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. त्याचे पालन केले जात नसल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे. पुरुषांसाठी 3 ते 4 युनिट्स तर 2 ते 3 युनिट्स महिलांसाठी असा नियम आहे.
तणाव आल्यानंतर आपण मद्यपान करतो, असे सहभागी नागरिकांमधील 44 टक्के नागरिकांनी मान्य केले आहे. तणावाचा दिवस गेल्यानंतर रात्री घरी मद्यपान करावे, असा विचार करणारे 37 टक्के नागरिक होते. कामाचा ताण किंवा आर्थिक विवंचनेमुळे मद्याचा आधार घेणाºयांची संख्या 60 टक्के आहे. कुटुंबातील तणावामुळे 36 टक्के नागरिकांनी मद्याचा आधार घेतल्याचे मान्य केले.