आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील श्रीमंतांची यादी प्रसिध्‍द करणा-या फोर्ब्स मासिक विक्रीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - जगभरातील अब्जाधीश व श्रीमंतांच्या वार्षिक यादीतून कायम प्रसिद्धीच्या झोतात राहणारे फोर्ब्स मासिकाची विक्री करण्यात येणार आहे, फोर्ब्स मीडियातर्फे प्रकाशित केल्या जाणा-या या मासिकाच्या विक्रीचा व्यवहार सुमारे 2514 कोटी रुपयांत(40 कोटी डॉलर) होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कर्मचा-यांना ई-मेल
फोर्ब्स मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल पर्लिस यांनी कर्मचा-यांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये काही जणांनी फोर्ब्स मीडिया विकत घेण्यात रस दाखवल्याचे म्हटले आहे.
> 1917 मध्ये बी.सी. फोर्ब्स मासिकाची सुरुवात केली.
> 96 वर्षे जुने बिझनेस मॅगझिन.
> 1200 मान्यवर लेखक फोर्ब्ससाठी लिहितात.
> पर्लिस यांच्या नेतृत्वाखाली मासिकाला डिजिटल वाचक मिळले. गेल्या तीन वर्षांत फोर्ब्स डॉट कॉमचे वाचक 1 कोटी 20 लाखांहून 2 कोटी 60 लाखांपर्यंत पोहोचले.