आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'फोर्ड' वर प्रचंड प्रेम, 102 वर्षांच्या फ्लाइडकडे 16 वाहने फोर्डचीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेनसिल्व्हेनियात राहणा-या 102 वर्षांच्या फ्लाइड पुलिन यांना फोर्डच्या गाड्यांशिवाय इतर कोणता ब्रँड आवडतच नाही. या वर्षी त्यांनी नवा फोर्ड 2013 एफ-150 ट्रक खरेदी केला आहे. हे त्यांचे फोर्ड कंपनीचे सोळावे वाहन आहे. 20 च्या दशकात सर्वप्रथम त्यांनी फोर्डची कार खरेदी केली होती. एखाद्या ग्राहकाची कंपनीवर एवढी निष्ठा असेल तर कंपनीनेही अशा ग्राहकाचा सन्मान करणे स्वाभाविक आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने पुलिन यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तावर फोर्ड ट्रक अध्यक्ष, अशी मानाची पदवी बहाल केली. या कार्यक्रमानंतर कंपनीतर्फे एक खास मेजवानी देण्यात आली. यात कंपनीच्या कर्मचा-यांसह पुलिन यांचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला.
B usatoday.com