आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former Maldives Prez Nasheed Takes Refuge In Indian Embassy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी भारतीय दुतावासात घेतला आश्रय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माले - मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी भारतीय दुतावासा समोर राजकीय पेच निर्माण केला आहे. मोहम्मद नशीद यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी त्यांनी भारतीय दुतावासात आश्रय घेतला आहे. यामुळे भारतीय दुतावासासमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे.

मोहम्मद नशीद त्यांच्या पक्षाच्या १२ संसद सदस्यांसह दुतावासात बसून आहेत. पोलिस त्यांना बाहेर येण्याचा आग्रह करत आहे. मात्र, ते दुतावास सोडण्यास तयार नाहीत.

आतंरराष्ट्रीय कायद्यानुसार मालदीव पोलिसांना कोणत्याही देशाच्या दुतावासामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. त्याचाच फायदा मोहम्मद नशीद यांनी घेतला आहे. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष नशीद हे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मो. नशीद यांना अटक करण्यासाठी दुतावासाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १० फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणीला हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.