आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Pakistan PM Yousaf Raza Gilani\'s Son Ali Haider Kidnapped In Multan

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानींच्या मुलाचे अपहरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचा मुलगा अली हैदर गिलानी यांचे अपहरण करण्यात आले आहे.

वृत्तसंस्थेत आलेल्या वृत्तात म्हटले गेले आहे की, अज्ञात बंदुकधा-यांनी पाकिस्तानमधील मुलतान शहरातून अली हैदर यांचे अपहरण करण्यात आले. अली एका प्रचारफेरीत सहभागी झाले होते. तसेच तेथे त्यांचे भाषण होणार होते. मात्र त्याचदरम्यान अज्ञात बदुंकधा-यांनी अली हैदरला गाडीत टाकून अज्ञात स्थळी रवाना झाले. यावेळी केलेल्या गोळीबारात अली हैदर यांचा खासगी सचिव आणि सुरक्षा रक्षक ठार झाले आहेत. याचबरोबर पाच जण जखमी झाले आहेत. या अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनने अथवा ग्रुपने घेतली नाही.

पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी टिपलेल्या फुटेजमध्ये हे दिसून येत आहे की, माजी पंतप्रधान गिलानी यांचा दुसरा मुलगा अली मुसा गिलानी हा आरडाओरड करीत आहे व पक्षाच्या लोकांना सूचना करीत आहे. तेथे उपस्थित असणा-या वृत्तवाहिन्यांची रिपोर्टरनी सांगितले की, बंदुकधारी लोक एका कारमध्ये प्रचारस्थळी आले व त्यांनी तत्काळ फायरिंग करीत अलीला ताब्यात घेतले. तसेच जवळ असलेल्या लोकांवर गोळीबार केला. त्यात त्यांचा खासगी सचिव व सुरक्षा रक्षक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.


पाकिस्तानात बंदी घातलेल्या तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने याआधी धर्मनिरपेक्ष पक्षांना इशारा दिला होता. त्यात झरदारी-गिलानी यांच्या पीपीपी आणि अवामी नॅशनल पार्टीचा समावेश आहे. या पक्षाच्या मनोधौर्यावर परिणाम करायचा व प्रचारापासून त्यांना वंचित ठेवण्याचा कुटील डाव या धार्मिक संघटनाचा आहे. येत्या शनिवारी (11मे) पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.