आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former Prime Minister Of Silvia Baloosconi Get Four Years Prisonment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करचुकवेगिरी प्रकरणी इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बलरुस्कोनींना चार वर्षांची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बलरुस्कोनी यांना करचुकवेगिरी प्रकरणी चार वर्षांच्या कैदेच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालास सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरल्याने 76 वर्षीय बलरुस्कोनी यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालावर बलरुस्कोनी यांनी थयथयाट केला. हा तर न्यायसंस्थेकडून छळवाद आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

बलरुस्कोनी यांना प्रत्यक्ष तुरुंगवास भोगावा लागणार नाही. सन 2006 च्या माफीच्या कायद्यानुसार तीन वर्षांची कैदेची शिक्षा आधीच माफ करण्यात आली आहे, तर वयामुळे एक वर्षाच्या तुरुंगवासाऐवजी त्यांना समाजसेवा करण्याची सक्ती केली जाईल अथवा घरातच नजरकैदेत राहावे लागण्याची शक्यता आहे. संसदेतून तात्पुरते निलंबित करण्यात यावे आणि सार्वजनिक पद भूषवण्यास बंदी घालण्यात यावी, असा निकाल मिलानच्या न्यायालयाने दिला होता. मात्र, निकालाचे फेरनिरीक्षण करण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर टांगती तलवार आहे.


बुंगा-बुंगा पाटर्य़ा, ‘नाद’मय कारकीर्द
धनाढय़ उद्योगपती आणि वादग्रस्त राजकीय नेते अशी बलरुस्कोनी यांची प्रतिमा आहे. तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेल्या बलरुस्कोनी यांच्यावर करचुकवेगिरी, अपहार, न्यायमूर्तींना लाच देण्याचे खटले सुरू आहेत. शिवाय अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचे प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे. पंतप्रधानपदी असताना अधिकृत निवासस्थानी देशी-विदेशी कॉलगल्र्सना बोलावून ‘बुंगा-बुंगा’ पाटर्य़ा सार्ज‍या करण्याचा नादही त्यांना होता.


विरोधकांचा जल्लोष
निकालानंतर रोमच्या कोर्ट ऑफ कॅसेशन इमारतीबाहेर विरोधकांनी शँपेन फोडून जल्लोष केला.


राजकीय पडसाद
बलरुस्कोनींच्या निकालामुळे इटलीच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते. बलरुस्कोनींचा पीडीएल आणि सेंटर-लेफ्ट डेमोक्रॅटीक पार्टीचे आघाडी सरकार सत्तेवर आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर स्थिर सरकार असणे आवश्यक आहे. पंतप्रधान एन्रिको लेट्टा यांना बलरुस्कोनींच्या पाठिंब्याची गरज आहे. निकालानंतर त्यांनी देशवासीयांना शांततेचे आवाहन केले आहे.


बलरुस्कोनींचे डावपेच
बलरुस्कोनींच्या पीपल ऑफ फ्रीडम पार्टी पक्षाची तातडीची बैठक त्यांच्या घरी झाली. पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी बलरुस्कोनी यांच्याकडे आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा आग्रह धरला आहे.