आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Prime Minister Of Uk Margret Thatcher Dies

PHOTOS : ब्रिटनच्या ‘इंदिरा गांधी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. थॅचर यांची मुले मार्क व कॅरोल यांनी सोमवारी थॅचर यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. विसाव्या शतकात कणखर नेतृत्व गुणांमुळे आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या थॅचर यांनी 1979 पासून देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली होती.

‘लंडन होम’वर गर्दी

थॅचर यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या लंडन होम या आलिशान निवासस्थानाच्या दारावर फुले वाहून र्शद्धांजली अर्पण केली. सक्रिय राजकारणातून निवृत्ती पत्करल्यानंतर त्या प्रचंड निराश झाल्या होत्या. त्यांना डिमेंशियाचा आजार होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्य् ा मध्य लंडनमधील रिट्झ हॉटेलमध्ये हॉटेल मालकाच्या पाहुण्या म्हणून वास्तव्यास होत्या.

खासगी अंत्यसंस्कार
थॅचर यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत. सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये खासगी स्वरूपात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.