वॉशिंग्टन - 2011 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये अल काईदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला यमसदनी पाठवले होते. ओसामा मृत्यूच्या भीतीमुळे मरण पावला, असा दावा अमेरिकेचा माजी नौसैनिकाने केला आहे. मृत्यूसमोर पाहताच तो घाबरला होता, असे माजी नौसैनिक रॉबर्ट ओनिलने खुलासा केला आहे.गोपनीय असलेल्या मोहिमेच्या काही गोष्टी आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
रॉबर्ट याने नुकतेच सीएनएन या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ओसामाबाबत मी केलेले विधान बहुतेकांना अमान्य असेल,पण त्याने मला काहीही फरक पडत नाही, असे रॉबर्टने मुलाखतीत सांगितले. त्यांनी यापूर्वीही अनेक लष्करी मोहिमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. ऑपरेशन ओसामा फार कठीण होते, असे सीएनएनच्या मुलाखतीत रॉबर्टने सांगितले आहे.