आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२५ शक्तिशाली महिलांत आठ भारतीय, फॉच्युनने केली यादी जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - विविध क्षेत्रांत कार्यरत राहून आपल्या जिद्द आणि चिकाटीने यशोशिखरे गाठणा-या पहिल्या २५ सर्वशक्तिवान महिलांमध्ये भारताच्या आठ महिलांचा समावेश आहे. "फॉर्च्युन'ने आशिया-प्रशांत क्षेत्रातील महिलांची ही यादी जाहीर करून नवी जागतिक क्रमवारीही प्रसिद्ध केली. यात आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर भारतीय महिलांत अव्वल स्थानावर आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य क्रमवारीत चौथ्या स्थानी आहेत. एचपीसीएलच्या निशी वासुदेव पाचव्या तर अ‍ॅक्सिस बँकेच्या शीखा शर्मा दहाव्या स्थानी आहेत.
भट्टाचार्य एसबीआय प्रमुखपदी सलग तीन वर्षापासून आहेत. २०८ वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेची जबाबदारी त्यांच्यावर असून कंपनीची वार्षिक उलाढाल ४०० अब्ज डॉलरची आहे. निशी वासुदेव या भारतीय तेल कंपनीचे नेतृत्व करणा-या पहिल्या महिला आहेत. चित्रा रामकृष्ण यांचे शेअर बाजाराचे नेतृत्व करणा-या यादीतील एकमेव नाव आहे.पेप्सिकोच्या सीइओ इंद्रा नुई यांचा फॉर्च्युनच्या क्रमवारीच्या यादीत तिसरा क्रमांक आहे.