आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बोस ऑडियो सिस्टिम'चे जनक अमर बोस यांचे निधन, आवाजाचा जादुगर हरपला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्टन- ऑडियो सिस्टिम आणि आवाजाच्‍या क्षेत्रात क्रांती घडविणारे 'बोस कार्पोरेशन'चे संस्‍थापक अमर बोस यांचे अमेरिकेत निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.

बोस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बॉब मरेस्का आणि मसॅचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी) बोस यांच्या निधनाची घोषणा केली. त्यांच्या मृत्युचे कारण मात्र सांगण्यात आले नाही.

बोस यांच्या संशेधनामुळे ऑडियो सिस्टिम आणि स्‍पीकर्सच्‍या दुनियेत क्रांती घडून आली होती. त्‍यांनी विकसित केलेल्‍या तंत्रज्ञानामुळे आवाजाच्‍या जादुला परिसस्‍पर्ष लाभला. 'बोस'चे स्‍पीकर्स, ऑडियो सिस्टिम, इयरफोन, हेडफोन अतिशय वैशिष्‍ट्पूर्ण असतात. अतिशय कमी फ्रिक्‍वेन्‍सीचा आवाजही या यंत्रणेत स्‍पष्‍टपणे ऐकू येतो. 'बोस'च्‍या ऑडियो सिस्टिममध्‍ये संगीत ऐकण्‍याचा आनंद अद्भूत असतो. अमर बोस हे मुळचे भारतीय होते. त्‍यांच्‍या कतृत्‍यामुळे देशाचेही नाव उंचावले.

मॅसॅचुसेटस इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी आपल्या शोधकार्याला सुरुवात केली आणि तिथेच आयुष्याची 40 वर्षे अध्यापनात घालवली. अमर बोस यांनी 1964 मध्‍ये कंपनीची स्थापना केली होती. बोस कंपनीचे मुख्यालय बोस्टनच्या फ्रॅमिंगममध्ये आहे. बोस यांनी 2011 मध्‍ये कंपनीचे मोठ्या प्रमाणावर समभाग एमआयटी संस्‍थेच्‍या नावावर केले. या समभागांवर मिळणारा नफा शिक्षण आणि संशोधनासाठी वापरला जातो.