आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकमध्ये इस्लाम कबूल न केल्याने चार मुलांचा शिरच्छेद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराकमध्ये इस्लामी स्टेटच्या अतिरेक्यांनी चार ख्रिश्चन मुलांचा शिरच्छेद केला आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. ब्रिटिश पाद्री कॅनन अँड्रयू व्हाइट यांनी हा दावा केला आहे.
बगदादचे पाद्री व्हाइट म्हणाले, अतिरेक्यांनी मुलांना विचारले, तुम्ही मोहंमद यांचे अनुकरण करणार का? ते म्हणाले, आम्ही येशूवर प्रेम करतो. ते ऐकल्यावर मुलांचा शिरच्छेद केला. सर्व मुले १५ वर्षांपेक्षा कमी वयाची होती. व्हाइट ख्रिश्चनांचे एकमेव धर्मगुरू आहेत.
बगदादमधील स्थिती खूप वाईट आहे. शहर हळूहळू अतिरेक्यांच्या ताब्यात जात आहे. ख्रिश्चनांवर जास्त निशाणा साधला जात आहे, असे व्हाइट म्हणाले.