आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Four Days Child Put Freezerd For Life Saving Svt Rare Disease

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीव वाचवण्यासाठी बाळाला चार दिवस गारठवले -एसव्हीटीचा दुर्मिळ आजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- हृदयाची स्थिती अत्यंत नाजूक असलेल्या एका बाळावर आगळावेगळा उपचार करून ब्रिटनमधील डॉक्टरांनी त्याला जीवदान दिले आहे. या बाळाचे शरीर तब्बल चार दिवस अतिशय थंड वातावरणात गारठवून त्याच्या हृदयाची गती सर्वसामान्य करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

एडवर्ड आयव्हिस या बाळाच्या हृदयाची अवस्था जन्मत:च सुप्रा व्हेन्ट्रिक्युलर टेसाकार्डिया (एसव्हीटी) होती. या अवस्थेत हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने पडतात आणि अशा अवस्थेत जगण्याची शक्यता पाच टक्क्यांपेक्षाही कमीच असते. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेल्या ‘चमत्कारिक’उपचारामुळे बाळ वाचले.

नेमके काय झाले
ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या एडवर्डच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला 300हून अधिक पडत होते. ठोक्यांची ही संख्या सामान्य स्थितीत पडणा-या प्रतिमिनिट 160 पेक्षा दुप्पट होती. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची गती कमी करून मेंदूसारख्या नाजूक अवयवाची संभाव्य हानी टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्याला कोल्ड जेलच्या ब्लँकेटमध्ये गुंडाळले. त्यामुळे त्याच्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअसवरून 33.3 अंश सेल्सिअसवर आणले.. उपचारादरम्यान एडवर्डच्या हृदयाच्या ठोक्यांची गती सामान्य पातळीवर आणण्यासाठी पाचवेळा डेफिब्रिलेटरद्वारे शॉकही देण्यात आले. चौथ्या दिवशी त्याच्या शरीराचे ठोके सामान्य पातळीवर आले.