आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four More Terrorists Executed In Faisalabad District Jail Of Pakistan

पाकिस्तानात फाशीचा सिलसिला, आणखी चार दहशतवाद्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फैसलाबाद - पाकिस्तानने आणखी चार दहशतवाद्यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी या चौघांवर आरोप होता. जियो न्यूज वाहिनीच्या वृत्तानुसार रविवारी या दहशतवाद्यांना फैसलाबादच्या ड्रिस्ट्रिक्ट जेलमध्ये फाशी देण्यात आली.
त्यापूर्वी मृत्यूदंडाचे चारही आरोपी अखलस अहमद उर्फ रूसी, गुलाम सरवर, झुबेर अहमद आणि राशीद टीपू यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत तुरुंगात हलवण्यात आले. अहवालानुसार दहशतवादी प्रकरणामध्ये शिक्षा उपभोगणा-या इतर 30 आरोपींनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यांनाही मुशर्रफ यांच्यावर हल्ल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती.
शुक्रवारी फैसलाबादच्या तुरुंगातच दोन दहशतवादी अकील उर्फ डॉक्टर उस्मान आणि अरशद महेमूद यांना फाशी देण्यात आली होती. पाकिस्तानने त्याचा व्हिडिओही जारी केला होता. उस्मान 10 ऑक्टोबर 2009 मध्ये लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी होता. तर मेहमूद 2003 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती मुशर्रफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दोषी होता.

मंगळवारी आणखी दोन दहशतवाद्यांना देणार फाशी
पाकिस्तानमधील डॉन या वेबसाइटवरील एका वृत्तानुसार, मंगळवारी दहशतवादी संघटना लश्कर-ए-झांगवी च्या दोन दहशतवाद्यांना सकाळी साडे सहा वाजता फाशीवर लटकवण्यात आले. लश्कर-ए-झांगवीचे अताउल्ला आणि मोहम्मद आजम यांच्या हत्येच्या आरोपात 2004 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

न्यायालयाने या दोन्ही आरोपींना आधीही अनेकदा फाशीवर लटकवण्याचे आदेश देण्यात आले होते. पण राष्ट्रपती कार्यालयातून स्थगिती आदेश आल्याने त्याच्या फाशीवर तात्पुरती बंदी आणण्यात आली होती. पण आता त्यांना फासावर लटकवण्याची तारीख ठरवण्यात आली आहे.