आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Passengers Had Fake Passports In Missing Malaysia Plane

विमानाचा शोध सुरू: आतंकवादी कट असल्याचा मलेशियाचा संशय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
239 प्रवाशांसह उड्डान केलेल्या MH370 मलेशियन विमानाचा सापडलेले नाही. विमानाचा संपर्क तुटून 24 तासांपेक्षाही जास्त वेळ झाला आहे. मलेशियन एअरलाइन्सने बेपत्ता विमान शोधण्यासाठी 94 बचाव अधिका-यांची टीम पाठवली आहे. तर दूसरीकडे मलोशियन एअरलाइन्सच्या अधिका-यांनी केलेल्या चौकशीत चार प्रवासांचे पासपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले आहेत. विमानातील चार प्रवासांनी बनावट पासपोर्ट दाखवत विमानात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. एअरलाइन्सने हा अतिरेकी कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
विमानातील चार प्रवाशांकडे बनावट पासपोर्ट असल्याचे, मलेशियाचे कार्यकारी वाहतूक मंत्री हिसामुददीन हुसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ते म्हणाले, 'विमानातील एकूण कितीजणांकडे असे खाटे पासपोर्ट होते आणि चोरीचे पासपोर्ट घेऊन हे लोक विमानात कसे चढले हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही'.
विमान बेपत्ता झाल्यानंतर लगचेच आमच्या इंटलिजेंस एजेंसी आणि दहशतवादी विरोधी पथकाने शोध मोहिम सुरू केली आहे आणि संबधीत देशांना तशा सुचना देण्यात आल्याचे हुसेन यांनी सांगितले आहे.
या विमानात पाच भारतीयांसोबतच 227 प्रवासी आणि वैमानिकांसह 12 सदस्य होते.
मलेशियन एअरलाइन्सने आपात्कालीन नंबर दिलेला आहे. विमान संबधी माहिती देण्यासाठी खाली दिलेल्या नंबर संपर्क साधावा.
मलेशिया: +603 8787 126 / +603 87871629 / +60387775777