आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Years Old Child Fall From Third Flower But His Life Save

तिस-या मजल्यावरून चारवर्षीय मुलगा पडला तरी पायावर उभा राहिला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये एका अपार्टमेंटच्या तिस-या मजल्यावरील खिडकीतून पडलेला चारवर्षीय मुलगा आश्चर्यकारकरीत्या जमिनीवर दोन्ही पायांवर सरळ उभा राहिल्याने सहीसलामत बचावला. त्यांच्या अंगावर साधा ओरखडाही उमटला नाही.

जेसिका हेस ही महिला कार्पेट्स धूत असताना तिने सोफा भिंतीला लावून ठेवला. तिचा चारवर्षीय मुलगा डॅलन हेस खिडकीतून खालच्या मजल्यावरील शेजा-याशी बोलण्यासाठी सोफ्यावर चढला. डॅलन तिस-या मजल्यावरील खिडकीतून बाहेर फेकला गेला. बाहेर फेकला जाताच त्याने हवेत दोन कोलांटउड्या खाल्ल्या आणि जमिनीवरील दगडावर दोन्ही पायांवर सहीसलामत उतरला. त्याला कोणतीही इजा झाली नाही, पण खिडकीचे तावदान मात्र फुटले. डॅलन खाली पडल्याबरोबर त्याच्या आईच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याला पाहण्यासाठी ती घाईघाईने खाली आली तर तो सहीसलामत पाहून तिलाही आश्चर्याचा धक्काच बसला. डॅलनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘मी पडलो, खरोखरच पडलो’, असे डॅलन म्हणाला. मी प्रचंड घाबरले होते. खालच्या मजल्यावर पोहोचल्यावर मला काय पाहावे लागेल, या कल्पनेनेच मी हादरले होते, असे सांगत जेसिकाने ही भयंकर घटना पालकांसाठी धोक्याची सूचना असल्याचे म्हटले आहे.