आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियावर हल्ल्यासाठी फ्रान्सचा बुधवारचा मुहूर्त, राष्‍ट्राध्‍यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - ब्रिटिश संसदेचा नकार आणि संयम पाळण्याचा सल्ला चीनने देऊनही येत्या बुधवारपर्यंत कधीही फ्रान्सकडून सिरियावर हल्ला चढवला जाऊ शकतो, ही कबुली फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी ‘ले मोंद’ला दिलेल्या मुलाखतीत स्वत:च दिली. येत्या बुधवारी सिरियाच्या मुद्द्यावर फ्रान्सच्या संसदेची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे.


प्रत्येक देशाला आपली भूमिका निश्चित करण्याचे स्वातंत्र्य आहे. ब्रिटिश संसदेच्या भूमिकेचा आमच्या भूमिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. सिरियाला दंड ठोठावणे आवश्यक आहे, असे फ्रान्स्वा म्हणाले. सिरियावर हल्ला करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा होता कामा नये. संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षकाचा अहवाल येण्याची प्रतीक्षा केलीच पाहिजे, असे चीनने म्हटले आहे.

कोणत्याही दबावाशिवाय होणा-या चौकशीचे चीन समर्थन करेल, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांच्याशी दूरध्वनीवरील संवादात सांगितले. सिरियावरील हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रात येणा-या कोणत्याही प्रस्तावाला आम्ही विरोध करू, असे रशियाने म्हटले आहे. जर्मनीनेही सिरियावरील लष्करी कारवाईमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.