आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सचा मालीवर ताबा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिंबक्टू- इस्लामी कायद्याखाली भरडून निघालेल्या मालीवर फ्रान्सच्या फौजांनी अखेर ताबा मिळवला.सोमवारी फ्रेंच फौजा टिंबक्टू शहरात घुसल्या त्यावेळी त्यांना कोणताही प्रतिकार झाला नाही. मात्र इस्लामी बंडखोरांनी टिंबक्टू शहरातील ऐतिहासिक ग्रंथालयास आग लावण्यात आली. त्यात असंख्य ग्रंथ खाक झाले.
सोमवारी फ्रान्सच्या नेतृत्वाखालील सैन्याने उत्तरेतील या शहरात यशस्वीपणे आगेकूच केल्याने बंडखोरांना मोठ्या प्रमाणात माघार घ्यावी लागली. या लष्करी कारवाईचे


नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. मालीचे ध्वज घेऊन विजयाच्या घोषणा देत नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला.

645 कोटींचे अर्थसाह्य
मालीतील हिंसाचारानंतर झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जपानसह आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून देशाला आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. जपानकडून सुमारे 645 कोटींची मदत देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मालीला 96 कोटी 76 लाखांची तातडीने मदत पुरवण्यात आली आहे.