आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समधील शाळेत ओलीस नाट्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- दक्षिण पॅरिसमध्ये मंगळवारी एका शाळेत ओलीस नाट्य घडले. एका शस्त्रधारी व्यक्तीने काही विद्यार्थ्यांना ओलिस ठेवले, परंतु नंतर त्यांची सुटका केली. ज्येष्ठ व्यक्तीलाही नंतर सोडण्यात आले. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
व्हिर्टी-सुर-सिइन या भागातील शाळेच्या आवारात या व्यक्तीने काही विद्यार्थ्यांना वेठीस धरले. या घटनेत सुरूवातीला बराच वेळ काय घडले आहे. हेच कळायला मार्ग नव्हता. नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. पोलिसांनी या माथेफिरू व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ओलिस धरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नर्सरी व प्राथमिक शाळेच्या मुलांचा समावेश असल्याचे पालकांमध्ये धाकधुक निर्माण झाली होती. परंतु पोलिसांच्या चर्चेच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर मात्र सर्वांनीच सुटकेचा नि: श्वास टाकला. मुलांना सोडण्याच्या बदल्यात त्याने एका मुलाच्या पालकाला ताब्यात ठेवले. ते नाट्यही बराचवेळ चालले. अखेर या ओलिस पालकाची सदर आरोपीने सुटका केली व या ओलिस नाट्यावरील पडदा पडला. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. सर्व मुले सुखरूप आहेत. सध्या फ्रान्समध्ये शाळेला सुट्या आहेत. परंतु सुट्यांच्या काळात अनेक शाळांमध्ये काही उपक्रम राबवले जातात.
तो मनोरूग्ण : जूनमध्ये बँक कर्मचा-यांना ओलिस ठेवण्यात आल्याची घटना घडली होती. यामागे देखील हाच व्यक्ती होता. तो मनोरूग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.