आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सचा मालीतील बंडखोरांच्या तळांवर बाँब वर्षाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बामाको - फ्रान्सने आपल्या ओलिस नागरिकांना सोडवण्यासाठी मालीच्या उत्तरेतील वाळवंटी भागातील बंडखोरांच्या तळांवर लढाऊ विमानांनी प्रचंड बाँब वर्षाव केला. महत्त्वाच्या शहरांतून पळून गेलेले बंडखोर डोंगर तसेच वाळवंटी भागात दडून बसले आहेत.
अल्जेरियाच्या सीमेजवळील टेसालिट भागात फ्रान्सच्या हवाई दलाने ही कारवाई करून बंडखोरांना पळवले आहे. बंडखोरांच्या तळांवर प्रचंड हल्लाबोल करताना बाँब वर्षाव केला. टेसालिट भागात बंडखोरांनी फ्रान्सच्या सात नागरिकांना ओलीस ठेवले आहे. या नागरिकांचे अलीकडेच सहारा भागातून अपहरण करण्यात आले होते. इफोगास डोंगरी भागात जाण्यासाठी टेसालिट अडरार हाच महत्त्वाचा मार्ग आहे. त्यालाच फ्रान्सच्या लष्कराने लक्ष्य केले. दरम्यान, हेलिकॉप्टर आणि मालवाहू विमानातून अनेक लष्करी तुकड्यांनी गाओ शहरातून सोमवारी कूच केली. त्यांना किडाल विमानतळावर तैनात करण्यात येणार आहे.