आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकची मोफत इंटरनेट सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - फेसबुकने मोफत इंटरनेट सुविधा पुरवणारी इंटरनेट डॉट ओआरजी सेवा झांबियामध्ये सुरू केली आहे. एका अ‍ॅपच्या माध्यमातून झांबियाच्या एअरटेल युजर्सना ही सेवा मिळेल. या सेवेच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करणार्‍या युजर्सना कोणताही डाटा चार्ज द्यावा लागणार नाही. या माध्यमातून हवामान, गुगल सर्च, विकिपीडिया, नोकरी सर्च, स्थानिक माहिती आणि आरोग्याविषयी माहिती मिळू शकेल. यामध्ये एकूण 13 सेवा मोफत आहेत. अन्य माहिती सर्च करण्यासाठी किंवा वेबसाइट उघडल्यास डाटा शुल्क द्यावे लागेल. फेसबुक व मेसेंजर सर्व्हिसही मोफत मिळेल. हे अँड्रॉइड फोनमध्ये अ‍ॅप आणि सामान्य मोबाइलमध्ये फीचर टूलप्रमाणे काम करेल.