आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Free Wi fi In Over World News In Marathi, USA, America

खूशखबर: उपग्रहाद्वारे संपूर्ण जगाला मोफत वाय-फाय देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. भविष्यात मोफत वाय-फाय सुविधा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. अंतराळातून उपग्रहाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना अमेरिकेने आखली आहे.

तुम्ही म्हणाल की सर्वत्र महागाई पेटली असताना मोफत इंटरनेट? परंतु ही माहिती खरी आहे. न्यूयॉर्कमधील 'मीडिया डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट फंड' (एमडीआयएफ) या संस्थेने याबाबत माहिती दिली.

एमडीआयएफनुसार, संपूर्ण जगाला मोफत वाय-फायने जोडण्यासाठी शेकडो उपग्रह तयार करण्यात येत आहेत. त्यांचे लवकरच अंतराळात प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहाद्वारे इंटरनेट डाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इंटरनेट डाटा जगातील कोणत्याही व्यक्तिला स्मार्टफोन, लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरद्वारे वापर करता येणार आहे.

सध्या जगातील ४० टक्के लोक इंटरनेटने जोडले गेलेले नाहीत. जगातील अत्यंत दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा अद्याप उपलब्ध होत नाही. प्रत्येक प्रदेशातील लोकांना इंटरनेटचा वापर करता येईल, अशी माहिती 'एमडीआयएफ'ने दिली आहे.