आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता मलेशियन विमानाच्या ठिकाणाविषयी आशा वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ/ क्वालालंपूर - दोन आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाविषयीच्या आशा वाढल्या आहेत, असे ऑस्ट्रेलियन तपास अधिकार्‍यांनी म्हटले आहे. चिनी उपग्रहाद्वारे दक्षिण हिंदी महासागरात एका संभाव्य अवशेषाचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्याच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून हा दावा करण्यात आला आहे.

कातडी पट्ट्यांसारखा भाग ऑस्ट्रेलियन मोहिमेत दिसून आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका विमानाला तराफ्यासारखा मोठा लाकडी तुकडा प्रथम दिसला. तो बेपत्ता विमानाशी संबंधित असावा. त्याच भागात एक मोठा तुकडा असल्याचे चिनी उपग्रहाच्या छायाचित्रात असल्याचा दावा करण्यात आला. त्याला आमच्या तपासातून पुष्टी मिळते, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट यांनी स्पष्ट केले आहे.

2.5 हजार क्षेत्रफळात तपास
ते विमानाचे अवशेष असावेत असे म्हणणे घाईचे होईल; परंतु विमानासंबंधीच्या निश्चित माहितीच्या जवळ आम्ही पोहोचलो आहोत, एवढे मात्र ठामपणे सांगता येईल. आपल्या हाती आशेच्या पलीकडे काही नाही, असे अबॉट यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून अडीच हजार क्षेत्रफळ भागात तपास करण्यात येत होता. त्यातून फारसे काहीही हाती आले नाही. रविवारी मात्र ऑस्ट्रेलियन तपास मोहिमेच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.

शोधमोहिमेत भारताचा सहभाग
मलेशियन विमानाच्या शोधमोहिमेत रविवारी भारताची दोन विमाने सक्रिय झाली. नौदल आणि हवाई विभागाच्या प्रत्येकी एका विमानाचा त्यात समावेश आहे. बेपत्ता विमानाला शोधण्यासाठी दोन आठवड्यांपासून अनेक देश प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केलेल्या घोषणेनुसार ही मदत देण्यात आली आहे. इलेक्ट्रो ऑप्ट्रॉनिक आणि इन्फ्रारेड क्षमता असलेली ही विमाने आहेत. त्याचा फायदा शोध मोहिमेत होऊ शकेल.

मोठे गूढ : मलेशियाहून बीजिंगकडे जाणारे विमान बेपत्ता झाल्याने जगभरातील हवाईतज्ज्ञदेखील चकित झाले. सर्वांसाठीच हे प्रकरण गूढ ठरले आहे. विमानातून 239 जण प्रवास करत होते. त्यात पाच भारतीय होते.