आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French President Francois Hollande Popular After Attack On Charlie Hebdo

फ्रान्स्वा ओलांद लोकप्रिय, 'चार्ली हेब्दो' साप्ताहिकावरील हल्ल्यानंतर पाहणीतील निष्कर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रान्समधील 'चार्ली हेब्दो' साप्ताहिकावरील दहशतवादी हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा आेलांद यांच्या लोकप्रियतेत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हल्ल्याच्या अगोदर ओलांद यांची लोकप्रियता २४ टक्के होती. ती आता ३४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

बीव्हीए पाहणीत आेलांद यांची लोकप्रियता वाढली आहे. अतिरेकी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर, त्यांची क्षमता आणि मीडिया कव्हरेजचे मोठे महत्त्व दिसून आले. हल्ल्यानंतर आेलांद यांनी शांती माेर्चा काढून त्यात जगातील प्रमुख नेत्यांसह लाखो लोकांना सहभागी केले. १९४४ मध्ये नाझी जर्मनीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर पॅरिसमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाहून हा मोर्चा मोठा होता. त्यांच्या लोकप्रियतेमुळे सोशलिस्ट पार्टीला मार्चमध्ये होणा-या स्थानिक निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार त्यांच्या पक्षाची प्रसिद्धी विरोधी नॅशनल फ्रंटच्या तुलनेने वेगाने वाढली आहे.ही पाहणी १३ आणि १४ जानेवारीला करण्यात आली होती. त्यात लोकांना इंटरनेट आणि टेलिफोनच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले होते.

पॅरिस अतिरेकी हल्ल्यातील तीन संशयितांची सुटका
फ्रान्सच्या पॅरिसमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ संशयितांपैकी तिघांची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व संशयितांची कसून चौकशी करण्यात आली असून त्यात या तिघांकडून ते आरोपी असल्याची काही माहिती मिळू शकली नाही, असे पॅरिसमधील प्रवक्ते डेनिस फौरियात यांनी म्हटले आहे. मागच्या आठवड्यात पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जणांचा प्राण गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियममधून बाराहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.

अतिरेकी शेरीफ कौचीचे कडक सुरक्षेत दफन
‘चार्ली हेब्दो’ वरील हल्लेखोरांपैकी एकाच्या मृतदेहाला रविवारी दफन करण्यात आले. या वेळी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. शेरीफ कौची असे या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याच्या भावावर शुक्रवारी दफनविधी करण्यात आला होता. या दोन भावांनी ७ जानेवारी रोजी साप्ताहिकावर हल्ला करून १२ जणांना ठार केले होते.

बेल्जियममध्येही फ्रेंच सैनिक तैनात
पोलिसांवर दहशतवाद्यांकडून अजूनही हल्ला होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन फ्रान्सने शेजारील बेल्जियममध्येही सैनिकांचे एक पथक रवाना केले आहे. हा कट उधळून लावण्यात आला आहे.

मीडिया वेबसाइट बंद
फ्रान्सच्या इस्लामी कट्टरवाद्यांकडून सायबर हल्ल्याची धमकी दिल्याच्या दुस-या दिवशी मीडियाच्या अनेक वेबसाइट ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. पेरिसियन, मॅरियन आणि २० मिनिट्ससारख्या संकेतस्थळांचा यात समावेश आहे. परंतु काही वेळातच ही संकेतस्थळे पूर्ववत झाली. २० हजार संकेतस्थळांना लक्ष्य करण्यात आले होते.