स्टॉकहोम - यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रान्सचे लेखक पॅट्रिक मोदियानो यांना जाहीर झाला आहे. मोदियानो यांनी दुस-या जागतिक युद्धातील नाझींच्या यातनांना
आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून जगासमोर आणले होते. मात्र, त्यांच्या पुस्तकांमधून तत्कालीन घटनांचा जास्त तपशील सापडत नाही.
मोदियानो यांचा जन्म दुसरे महायुद्ध संपल्याच्या वर्षी म्हणजेच १९४५ मध्ये झाला. त्यामुळे त्या युद्धातील त्या वेळच्या वेदना, यातना त्यांनी त्यांच्या बालपणात बघितल्या. त्याचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. या यातना नंतर मोदियानो यांनी पुस्तकातून व्यक्त केल्या. संवेदनांच्या अभिव्यक्तीनुसार मोदियानो यांना वर्तमान मार्सेल प्राउस म्हटले जाते. मार्सेल प्राउस हेसुद्धा फ्रान्सचेच होते. त्यांनी लिहिलेली ‘इन सर्च ऑफ लास्ट टाइम’ कादंबरी चार हजार पानांची असून यात सुमारे दोन हजार पात्रांचा समावेश आहे. मोदियानो यांचे लेखन मार्सेल यांच्या अगदी विपरीत आहे.