आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो युवर फार्मरः अन्नसुरक्षेचा अमेरिकी पॅटर्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - भारतात अन्नसुरक्षा विधेयकावरून राजकीय चर्चा आणि राजकारण रंगत असताना अमेरिकेत या विषयावर जनतेच्या सहभागाने राबविलेले अनोखे अभियान अत्यंत यशस्वी झाले आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी स्थानिक शेतकर्‍याना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले होते.

"नो यूवर फार्मर नो युवर फूड" (केवायएफ२) तुमचा शेतकरी आणि तुमचे अन्न जाणून घ्या, असे हे अभियान आहे. या अभियानानंतर अल्पावधीतच आर्थिक उलाढाल अब्जावधी डॉलरमध्ये गेली. या अभियानामुळे देशाची अन्नसुरक्षा आणि शेतकर्‍यानी उन्नती या दोन्ही बाबी साध्य होऊ लागल्या आहेत.