आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सात महिन्यांपासूनच कळते बाळाला व्याकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोरांटो - द्वैभाषिक वातावरणात जन्मलेल्या बाळाला वयाच्या अवघ्या सातव्या महिन्यापासून भाषांमध्ये फरक करता येतो आणि त्या भाषांचे व्याकरणही समजते, असे एका नव्या संशोधनात आढळून आले आहे.

द्वैभाषिक वातावरणात जन्मलेले बाळ भाषेचा उच्चार आणि शब्दोच्चाराच्या अवधीवरून इंग्रजी किंवा जपानी अशा विपरीत शब्दरचनेच्या दोन भाषांमध्ये फरक करू शकते, असे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ आणि पॅरिस डिस्कार्टेस विद्यापीठाच्या संशोधकांना आढळून आले आहे. इंग्रजीमध्ये नामाच्या आधी क्रियापद येते आणि नामाचा अवधी दीर्घ असतो, तर हिंदी किंवा जपानी भाषेमध्ये नाम आधी व क्रियापद नंतर येते तसेच नामाच्या शब्दाचा उच्चार वरच्या स्वरात केला जातो. द्वैभाषिक वातावरणातील सात महिन्यांच्या बाळांनाही हा फरक सहज समजतो आणि ते भाषिक फरक करण्यास सक्षम असतात, असे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचे मानसशास्त्रज्ञ जॅनेट वेर्कर यांनी म्हटले आहे.