आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशावर : बालकांच्या अंत्यसंस्कारात जन्मदात्यांचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर येथे आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या शाळकरी मुलांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात झाली आहे. या हल्ल्यात 132 मुले आणि नऊ कर्मचारी ठार झाले आहेत. मंगळवारी सायंकाळपासूनच इस्लामी पद्धतीने काही मृतांचा अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात करण्यात आली होती. या हल्ल्यात सहभागी असलेले सर्व सात दहशतवादी ठार झाले आहे.

संपूर्ण पाकिस्तानात शोक
हल्ल्यात ठार झालेल्या मुलांच्या अंत्ययात्रेमध्ये त्यांच्या कुटुंबामधील नातेवाईकांबरोबरच इतरही लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. हल्ल्यात ठार झालेल्या एका मुलाच्या वडिलांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले की, माझा मुलगा केवळ 15 वर्षांचा होता आणि आठव्या वर्गात शिकत होता. काल रात्री मी त्याच्या बरोबर बोललो होतो. सकाळी तो माझ्या आधी उठला आणि शाळेत निघून गेला.

अल्लाह बदला घेईल
आणखी एक मृत मुलगा गुल सेर याचे काका साजीद खान म्हणाले की, त्यांच्या पुतण्याला डॉक्टर बनायचे होते. पण आता तो कफनमध्ये आहे. आम्ही त्या दहशतवाद्यांकडून बदला घेऊ शकणार नाही. पण अल्लाहने त्यांच्याकडून बदला घ्यावा अशी दुवा मी करेल.
तालिबानकडूनही निषेध
जगभरातून घटनेचा निषेध होत असतानाच, अफगाणिस्तानातील तालिबाननेही या घटनेचा निषेध केला आहे. हल्ला करणा-या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्या वैचारिक साम्य आहे. तसे अशले तरी अफगाणिस्तान तालिबानने या हल्ल्याचा निषेध करत हल्ला गैर इस्लामिक अशल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तान तालिबानचे प्रवक्ते जहीबुल्लाह मुजाहीद यांनी पेशावर हल्ल्यात ठार जालेल्या मुलांच्या कुटुंबीयांना शोक संदेश पाठवत असल्याचे म्हटले आहे.
पुढे पाहा, अंत्यविधीचे काही PHOTO