आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थॅचर यांच्यावर 17 एप्रिलला अंत्यसंस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या निधनावर जगभरातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. सोमवारपासून हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. दरम्यान, थॅचर यांच्यावर 17 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार होणार आहे थॅचर यांचे पार्थिव रिट्झ हॉटेलमधून हलवण्यात आले आहे. निधनापूर्वी त्या याच हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुढल्या आठवड्यात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी थॅचर यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना त्या अमेरिकेच्या ख-या मित्र होत्या, असे म्हटले आहे. शीतयुद्धाला संपवण्यासाठी थॅचर यांचे नेहमीच स्मरण केले जाईल, असे जर्मनीच्या चान्सलर अँगेला मार्केल यांनी म्हटले आहे. ब्रिटनने त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगती साधली होती, अशा भावना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केल्या. त्यांनी ट्विट करून या भावना मांडल्या आहेत.
संसदेत श्रद्धांजली : थॅचर यांच्या निधनावर ब्रिटनच्या संसदेत बुधवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यात थॅचर यांच्या कार्य, कर्तृत्वावर चर्चा होईल.