आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • G 20 Summit Modi Put On Bank Account Information Issue

जी-२० परिषद : भारताला मोठे यश, बँक खात्यांच्या माहितीचा मुद्दा जाहीरनाम्यात येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन- प्रत्येक देशाने बँक खात्यांच्या माहितीची देवाण-घेवाण करण्याचा मुद्दा जी-२० च्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला जाऊ शकतो. अर्थात, एखाद्या भारतीयाचे खाते इतर देशातील बँकेत असल्यास त्यावर भारत सरकार नजर ठेवू शकते. त्यासाठी भारताला इतर देशांच्या परवानगीची गरज भासणार नाही.

जाहीरनामा रविवारी जारी केला जाणार आहे. तसे झाल्यास काळ्या पैशांच्या विरोधातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे राजनैतिक यश मानले जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत पाच वर्षांपर्यंत दोन टक्के वृद्धी आणि इंधन सुरक्षेसाठी कच्च्या तेल बाजारात स्थिरतेलाही जाहीरनाम्यात समाविष्ट केले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिस्बेनमध्ये जोरदार स्वागत झाल्यानंतर शनिवारी जी-२० च्या आयोजनस्थळी मोदी यांनी आगमन होताच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबोट यांची अनाहूतपणे गळाभेट घेतली. दरम्यान, शुक्रवारी मोदी यांनी व्यासपीठावरून दहशतवादासह विकास, रोजगार अशा मुद्द्यांवर देशाची भूमिका मांडली.
"विकासाला महत्व द्या; राजकीय दबावापुढे झुकणे थांबवा'
विकासाला विरोध होणे स्वाभाविक असते. परंतु कोणत्याही परिस्थितीत राजकीय दबावापुढे झुकणे थांबले पाहिजे, असे मत पंतप्रधानांनी शिखर परिषदेच्या पहिल्याच सत्रात व्यक्त केले. सुधारणा म्हणजे सरकारी कार्यक्रम अशी एक कल्पना जगभरात पाहायला मिळते. जनतेवर याचा बोजा पडेल असे वाटत असते. म्हणूनच सुधारणेमध्ये जनहित केंद्रस्थानी असले पाहिजे. असा कार्यक्रम पडद्यामागील लोक नव्हे तर जनतेतूनच पुढे गेला पाहिजे. रोजगार निर्मिती न करणारा विकास म्हणजे बेइमानी ठरेल.
ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक
ब्रिक्स देशांच्या विकासासाठी यासंबंधीच्या करारावर २०१६ पर्यंत सहमती होईल, असा विश्वास मोदी यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केला. त्याच वर्षी ही बँक सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भारत लवकरच बँक अध्यक्षाचे नाव सूचित करेल. पहिला अध्यक्ष भारतातून असेल. त्याचा कालावधी सहा वर्षांचा राहील.
टीकेने पुतीन नाराज
युक्रेनमधील हस्तक्षेपामुळे शिखर परिषदेत झालेल्या टीकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे बैठकीच्या रविवारच्या आपल्या कार्यक्रमात त्यांनी अनेक बदल केले. आयोजकांच्या भोजनालाही त्यांनी हजेरी लावली नाही.