आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20 म्हणजे काय? कोण-कोण होतात सहभागी आणि कोणत्या मुद्यावर होते चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 -16 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे जी- 20 शिखर परिषद होत आहे. जी-20 शिखर परिषद म्हणजे काय, हा सर्वसामान्य वाचकांना पडणार सर्वसाधारण प्रश्न आहे. या परिषदेत कोणत्या मुद्यांवर चर्चा होते, त्यात कोणते देश सहभागी होतात? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. तर त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला येथे देणार आहोत.
जी-20 म्हणजे काय?
जी-20 चा अर्थ आहे GROUP -20. हा जगातील 19 शक्तीशाली देश आणि युरोपियन युनियन (युरोप देशांचा समुह) यांचा समुह आहे. याची स्थापना 1999 मध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी केली होती. मात्र 2008 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीनंतर या जागितिक समुहाचे नेतृत्व अर्थमंत्र्यांकडून समुह देशांच्या प्रमुखांकडे सोपवण्यात आले.
हा समुह जगातील 85 टक्के अर्थव्यवस्था आणि 75 टक्के व्यापारावर नियंत्रण ठेवतो. अमेरिका, कॅनडा, ब्रिटेन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चीन, भारत रशिया यांसारख्या महत्वाच्या देशांचे प्रमुख दरवर्षी जी-20 परिषदेच्या निमीत्ताने भेटत असतात. आज सुरु झालेली शिखर परिषद ही 8 वी आहे. याचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळाले आहे. पुढील वर्षी (2015) ही परिषद तुर्कस्थानात होणार आहे.

पुढील स्लाडमध्ये, कोण-कोण सहभागी होतात