आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20 परिषदेतही मोदी स्टाईल आयकॉन, घेतल्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी, काळ्या पैशांवर चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- G20 परिषदेत सर्व राष्ट्राच्या नेत्यांनी संयुक्तपणे फोटो काढला.)
सिडनी - ऑस्ट्रेलियात आजपासून (शनिवार) जी - 20 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिषदेला सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टाईल आयकॉन दिसून आला. मोदी सुटाबुटात अगदी देखण्या स्वरुपात दिसून आले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली, चर्चा केली. या परिषदेत काळ्या पैशांवरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
जी- 20 शिखर परिषद सुरु होण्यापूर्वी रशिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेत सहभागी होण्यासाठी हजर झाले आहेत. तर त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर रशियाच्या चार युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या ऑस्ट्रेलियाने देखील त्यांच्या ताफ्यातील तीन युद्धनौका रशियाच्या जहाजांवर नजर ठेवण्यासाठी तैनात केल्या आहेत. रशियाच्या वतीने केले जाणारे हे शक्तीप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे.
यु्द्धनौकांच्या मुद्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले आहे, की आम्ही जिथे जातो, तिथे ही जहाजे तर असणारच.

पुढील स्लाइडवर पाहा, जी-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणकोणत्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली, चर्चा केली... बघा परिषदेचा संयुक्त फोटो...