आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gabriel Garcia Marquez Dies At 87 News In Divya Marathi

शब्दयात्री गॅब्रिएल मार्क्वेझ यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको सिटी - ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ या कादंबरीमुळे जगभरामधील आदरणीय लेखकांच्या प्रभावळीत स्थान मिळविणारे नोबेल पुरस्कार विजेते लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांचे निधन. ते 87 वर्षांचे होते. रँडम हाऊसमधील त्यांचे माजी प्रकाशक ख्रिस्तोबल पेरा यांनी मार्क्वेझ यांच्या निधनासंबंधी माहिती दिली.

लॅटिन अमेरिकेतील प्रेम, कौटुंबिक वातावरण आणि हुकुमशाहीबद्दलच्या कथा मार्क्वेझ यांच्या साहित्यामध्ये चितारण्यात आल्या आहेत. कोलंबियन वंशाचे मार्क्वेझ यांना 1982 मध्ये साहित्यासाठीच्या नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते. लॅटिन अमेरिकेतील काल्पनिक पौराणिक संकल्पनेवर आधारलेल्या या कादंबरीने जगभरातील वाचकांना भुरळ घातली होती.

विसाव्या शतकामधील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावशाली लेखकाचे नाव साहित्यामधील डिकन्स, टॉलस्टॉय व हेमिंग्वे या प्रथितयश व आशयसंपन्न लेखकांच्या बरोबरीने घेतले जात असे. मार्क्वेझ यांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमधून अनुवादित झाले होते. ‘मॅजिक रिअ‍ॅलिझम’ या साहित्यामधील अत्यंत गाजलेल्या प्रवाहाचे मार्क्वेझ हे आघाडीचे शिलेदार होते. संपूर्ण दक्षिण अमेरिकेमध्ये ते ‘गाबो’या नावाने ओळखले जात असे.

‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’या पुस्तकाच्या आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली आहे. चिलीचे प्रसिद्ध कवी पाब्लो नेरुदा यांच्यासह अनेकांनी या साहित्यकृतीचा गौरव केला आहे. ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’खेरीज मार्क्वेझ यांनी ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’, ‘क्रॉनिकल ऑफ अ डेथ फोरटोल्ड’, ‘मेमरीज ऑफ माय मेलँचोली व्होर्स’, ‘द ऑटम ऑफ द पॅट्रिआर्क’, ‘नो वन राइट्&९६ल्ल्न;स टू द जनरल’, ‘द एव्हिल अवर’, ‘न्यूज ऑफ अ किडनॅपिंग’, अशी बहुपेडी साहित्यनिर्मिती केली आहे.

(फोटो : क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो आणि गॅब्रिएल माक्र्वेझ.)