आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबर्लिन - जर्मनीच्या हॅकर्सनी अॅपलच्या नव्या पिढीतील आयफोनची बायोमेट्रिक ओळखप्रणाली भेदण्यात यश मिळवले आणि ही प्रणाली फारशी सुरक्षित नसल्याचेच दाखवून दिले आहे. चाओस कॉम्प्युटर क्लब (सीसीसी) असे या हॅकर्सच्या टोळीचे नाव असून अॅपलच्या आयफोनची सुरक्षा प्रणाली पुरेशी भक्कम नसल्याचे त्यांनी आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे.
आयफोन- 5एसच्या मालकाच्या कोणत्याही काचेवर उमटलेल्या फिंगर प्रिंट्सच्या छायाचित्रांचा वापर करून हा आयफोन अनलॉक करता येऊ शकतो. फिंगर प्रिंट्सनेही फोन सुरक्षित ठेवला जाऊ शकत नाही. अशा वेळी फोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी सर्वसाधारण पासवर्डचाच वापर केला पाहिजे, असे सीसीसीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.