आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Galaxy News In Marathi, Scientific Research, Divya Marathi

आकाशगंगेचे 360 अंशांचे पोर्ट्रेट बनवण्यात वैज्ञानिकांना यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - गेल्या दशकभरात नासाच्या स्पिट्जर स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने काढलेल्या 25 लाखांपेक्षा जास्त छायाचित्रांना एकत्र करून वैज्ञानिकांनी आपल्या आकाशगंगेचे 360 अंशांचे पोर्ट्रेट तयार केले आहे. या पोर्ट्रेटच्या साहाय्याने आपल्या आकाशगंगेची सविस्तर माहिती मिळू शकते. आकाशगंगेची संरचना व त्यातील तत्त्वांविषयीच्या जाणिवाही यामुळे वाढू शकतात.


लाखो इन्फ्रारेड छायाचित्रांच्या आधारे बनवलेल्या या पोर्ट्रेटची निर्मिती विस्कॉन्सिनमाडिसन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केली आहे. या पोर्ट्रेटमध्ये या टीमने लाखो नव्या तथ्यांची माहिती दिली आहे. या अभ्यास प्रकल्पातील प्रोफेसर एडवर्ड चर्चवेल म्हणतात, हे पोर्ट्रेट बनवल्यावर हे प्रकर्षाने जाणवते की, आपली आकाशगंगा एका रॉडच्या आकारासारखी आहे.


त्याच्या अगदी मधोमध आपली सूर्यमाला आहे. आता आम्हाला याचाही अंदाज करता येतोय की, आपल्या आकाशगंगेचे स्पायरल आर्म्स कु ठे आहेत. चर्चवेल यांनी सांगितले की, हे पोर्ट्रेट अधिकाधिक खगोलशास्त्रीयांना व तारकामंडळांना उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचू शकेल.


आकाशगंगा किंवा तारकापुंज
गुरुत्वाकर्षण शक्तीच्या साहाय्याने जोडला गेलेला अवकाशातील असा भव्य घटक ज्यात कोट्यवधी तारे, स्टेलर, रेनमेंट, वायू, धूलिकण यांचा संचार आहे. अवकाशात विविध आकाराच्या आकाशगंगा अस्तित्वात आहेत. छोट्या तारकापुंजांमध्ये केवळ एक कोटीपर्यंतच तारे आहेत. मोठ्या आकाशगंगांमध्ये हजारो अब्ज तारका
अस्तित्वात आहेत.


ग्लिम्प्स 360 च्या नजरेने पाहा आकाशगंगा
आकाशगंगेच्या या पोर्ट्रेटला वैज्ञानिकांनी ‘ग्लिम्प्स 360’ हे नाव दिले आहे. या पोर्ट्रेटने आपल्या आकाशगंगेचा अभूतपूर्व देखावा दिसतो. या पूर्वीच्या आकाशगंगेच्या छायाचित्रांत नेहमीच तारकांच्या जागी वायू व धूसरशी प्रभा दिसून आली. त्यामुळे कधीच चित्र स्पष्ट दिसले नाही. मात्र, स्पिट्जर स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने काढलेल्या इन्फ्रारेड छायाचित्राच्या साहाय्याने जे पोर्ट्रेट तयार केले आहे त्यात तारे व प्रत्येक तपशील स्पष्ट दिसतो.