आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडच्या बंडाला राजांची मंजुरी, विरोधकांना तत्काळ इशारा जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडची सत्ता ताब्यात घेणारे लष्करप्रमुख प्रयुत चान ओचा यांना राजे भूमिबल अतुल्यतेज यांनी सरकार चालवण्यासाठी मंजुरी दिली आहे. सरकारला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयुत राजांकडे गेले होते.
मंजुरीनंतर लष्करप्रमुखांनी विरोधकांना तत्काळ इशारा जारी केला. लष्करी सरकारला विरोध करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. थायलंडमध्ये सात महिन्यांचे आंदोलन आणि न्यायालयाने पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांना बडतर्फ केल्यानंतर 22 मे रोजी लष्कराने सत्ता ताब्यात घेतली.
लष्कराविरुद्ध रविवारीही निदर्शने झाली. देशात राजकीय स्थैर्य आणण्यासाठी जवळपास सर्व बड्या राजकीय नेत्यांना लष्कराने एका ठिकाणी आणून तोडगा काढण्यास सांगितले होते. लष्करी परिषदेने सिनेट बरखास्त करून प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादले होते. परिषदेने आर्थिक प्राधान्य जाहीर केले होते. यामध्ये शेतकर्‍यांची थकीत रक्कम तत्काळ देणे. लष्करी बंडाविरूद्ध सुरू असलेल्या आंदोलनावर नियंत्रण आणण्यासाठी 18 वृत्तपत्रांच्या मालकांना बोलावण्यात आले आहे.