आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गांधीजींचे एक पत्र 96 लाखांचे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या एका पत्राचा तब्बल 96 लाख रुपयांत लिलाव झाला. लिलावात पत्राला केवळ आठ ते 12 लाख रुपयांपर्यंत किंमत मिळण्याची अपेक्षा होती. गांधीजींनी हे पत्र भारताच्या तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिवांना लिहिले होते. त्यात त्यांनी स्वत:च्या सुटकेची विनंती केली होती. ब्रिटनमधील श्रॉम्पशायर शहरात या पत्राचा लिलाव झाला.

एखाद्या भारतीय नेत्याने लिहिलेल्या एखाद्या पत्राला मिळालेली ही सर्वात मोठी बोली आहे. एका भारतीयाकडे हे पत्र होते. केवळ घर खर्च भागवण्यासाठी त्याला या पत्राचा लिलाव करायचा होता, असे मलॉक्स या लिलावकर्त्या कंपनीचे प्रमुख रिचर्ड वेस्टवुड ब्रुक्स यांनी म्हटले आहे. याच कंपनीने मागील वर्षी महात्मा गांधींचा चष्मा आणि त्यांच्या काही धार्मिक पुस्तकांचा लिलाव केला होता.