आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमधील ग्लासगो शहरात धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लासगो - दिल्लीतील घटनेने संपूर्ण जग हादरलेले असतानाच ब्रिटनच्या ग्लासगो शहरात गुरुवारी रात्री अशीच लाजिरवाणी घटना उजेडात आली. धावत्या बसमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाला आहे.

शहरातील सिल्व्हरबर्न शॉपिंग सेंटरहून डबल डेकर बस निघाली. पीडित मुलगी बसच्या खालच्या भागात आपल्या मैत्रिणींसमवेत बसलेली होती. काही वेळाने ती बसच्या वरच्या भागात गेली. तेथे दोन जणांनी तिची छेड काढली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे; परंतु घटनेविषयी लोकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही मुलगी त्या दोन व्यक्तींसोबत चर्चा करत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असताना तिला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी काही प्रवासी धावले; परंतु ते केवळ दोन प्रवासी होते. बाकी प्रवाशांनी दोन स्टॉपनंतर गाडी सोडून दिली होती. आरोपींचे वय 18 ते 20 वर्षे आहे. घटनेनंतर पीडिताला काही प्रवाशांनी घरापर्यंत नेऊन सोडले म्हणून बरे झाले. हा प्रसंग गुदरल्याने पीडिता प्रचंड घाबरली आहे. आरोपी अद्याप फरार आहेत.