आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच-यामुळे तयार झाले पर्यटनस्थळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्नियातील फोर्टब्रॅगमधील मॅककॅरिशर नावाचा हा समुद्रकिनारा. ग्लास बीच नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. या समुद्रकिना-यावर अनेक रंगांचे, विविध आकारांचे काचेचे तुकडे पसरलेले आहेत. 20 व्या शतकात फोर्टब्रॅगमधील रहिवाशांनी डोंगरावरून घरातील कचरा इथे टाकण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि जुन्या वाहनांचे खराब झालेले भागही तेथे फेकले जाऊ लागले. कॅलिफोर्नियातील जलसंपदा विभागाने या जागेवर कचरा टाकण्यास मनाई केली. येथे येण्यावर बंदी घातली आणि वर्षानुवर्षे स्वच्छतेचे काम केले. पाण्यामुळे कचरा तर वाहून गेला, मात्र काचेचे तुकडे तसेच राहिले. त्यानंतर ग्लास बीच नावाची ही जागा मॅककॅरिशर पार्कचा एक भाग बनली. अनेक वर्षे पाण्याच्या संपर्कात राहिल्याने काचा गुळगुळीत दगडांसारख्या झाल्या आहेत. दररोज हजारो पर्यटक येथे भेट देतात. दरवर्षी इथे ग्लास फेस्टिव्हलही आयोजित केले जाते. Bamazingthingsintheworld