आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन डेसाठी हमखास भेट योजना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


व्हॅलेंटाइन डे जवळ येतोय. या दिवसाचे औचित्य साधून जपानमधील एका कंपनीने व्हॅलेंटाइन डे इन्शुरन्स नावाची एक सेवा देण्याचे ठरवले आहे. जपानमधील ज्या तरुणांना मैत्रीण नाही आणि त्या दिवशी काही भेटवस्तू मिळावी, अशी ज्यांची इच्छा आहे, त्यांनी स्वत:चे नाव आणि पत्ता कंपनीच्या वेबसाइटवर पाठवावे.14 फेब्रुवारीला या तरुणांना एक पॅकेज मिळेल. त्यात चॉकलेटसोबत एक खासगी संदेशही असेल. या सेवेसाठी 300 रुपये भरावे लागतील. काही जणांना स्वत:साठी व्हॅलेंटाइन डेचे गिफ्ट खरेदी करण्याची ही कल्पना थोडी विचित्र वाटू शकते, पण जपानी तरुणांसाठी ही कल्पना दिलासा देणारी अहे. उगवत्या सूर्याच्या या देशात व्हॅलेंटाइन डेला महिलांना भेटवस्तू देण्याची प्रथा नाही. येथे फक्त पुरुषांना विशेषत: चॉकलेटच्या स्वरूपात गिफ्ट दिले जाते. व्हॅलेंटाइन डेच्या संपूर्ण आठवड्यात येथे खूप मोठ्या प्रमाणावर चॉकलेट विक्री केली जाते. अनेक कंपन्या तर वर्षभरातील कमाईपैकी अर्धी कमाई तर याच महिन्यातील चॉकलेट विक्रीवर करून घेतात.

theonion.com